6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

मारहाणीचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तरुणाची आत्महत्या….चार जणांवर गुन्हा..

अहिल्यानगर: कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरे घेऊन जाण्याच्या संशयावरून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना
गळनिंब येथे घडली. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला. आपली बदनामी झाल्याचे भीतीने या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चार जणांवर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत वडीतके असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल माहिती अशी की मयत वडितके यास कत्तलीसाठी गोवंश जनावर घेऊन जात असल्याच्या संशयावरून काहींनी मारहाण केली. या मारहाणीचे चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती वडितकेला झाली.

आपली समाजात बदनामी झाली हे तो सहन करू शकला नाही. त्याने गळनिंब येथील राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत अनिकेतचा भाऊ चैतन्य हा घरी आला असता त्यास अनिकेने गळफास घेतलेला दिसून आला. त्यांनी तातडीने त्यास खाली घेऊन लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास मृत घोषित केले.

त्यानंतर सर्व नातेवाईक दोन्ही पोलिस ठाण्यात गेले व संबंधित आत्महत्या करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक करा, त्याशिवाय आम्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून देणार नाही तसेच मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे अमोल वडितके यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खर्डे, सौरभ लहामगे (सर्व रा. कोल्हार ता. राहाता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या