Solapur Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षांकडून आता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Ajit Pawar NCP) देखील निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत आहे.
सोलापूर (Solapur) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हा आढावा बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची सोलापूर शहर जिल्हा सहसंपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आता अण्णा बनसोडे यांच्यावरही सोलापूरची जबाबदारी असणार आहे.
सोलापूर शहर, ग्रामीण जिल्ह्याच्या सामाजिक समीकरणांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. संपर्कमंत्री कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या जोडीला सहसंपर्कमंत्री म्हणून अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.
आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या बरोबरच अण्णा बनसोडे हे सोलापूरच्या निवडणूक नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.



