6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

US Visa Policy : नागरिकांनो, ‘या’ आजारग्रस्त लोकांना मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा

US Visa Policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यानंतर संपूर्ण जगात अनेक चर्चांना उधाण आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकेची व्हिसा पॉलिसी बदली आहे. ज्यामुळे आता काही लोकांना अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही.

ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटले आहे की मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, कर्करोग किंवा मानसिक आजार असलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा नाकारला जाऊ शकतो. या अर्जदारांना “सार्वजनिक शुल्क” म्हणून वर्गीकृत केले जाईल, म्हणजेच भविष्यात अमेरिकन सरकारवर आर्थिक भार बनू शकणारे.

आरोग्य आणि आर्थिक स्थिती व्हिसा मंजुरीचा आधार

परराष्ट्र विभागाने दूतावास आणि वाणिज्य दूतावासांना पाठवलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये असे म्हटले आहे की व्हिसा अधिकारी आता अर्जदाराचे आरोग्य, वय आणि आर्थिक क्षमतेचे तपशीलवार मूल्यांकन करतील. जर एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील सदस्याला दीर्घकालीन आणि महागड्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता असेल तर त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.

तर नवीन धोरणात गंभीर आरोग्य जोखमींच्या यादीत लठ्ठपणा, दमा, स्लीप एपनिया आणि उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थितींचा समावेश आहे. पूर्वी, व्हिसा प्रक्रिया प्रामुख्याने संसर्गजन्य रोग आणि लसीकरण नोंदींवर केंद्रित होती, परंतु आता व्हिसा मूल्यांकनात असंसर्गजन्य रोगांचा देखील समावेश आहे.

अर्जदाराच्या आर्थिक क्षमतेवरही भर

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अर्जदार स्वतःच्या आयुष्यभराचा वैद्यकीय खर्च भागवू शकतो की त्याला सरकारी मदतीची आवश्यकता आहे हे मूल्यांकन करण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या मूल्यांकनात अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांची परिस्थिती देखील विचारात घेतली जाईल.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या