Maharashtra Election : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता दरम्यान अनेक धार्मिक व सामाजिक सण येतात . या सणांमुळे समाजातील सलोखा राखत आचारसंहितेचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Comission) ठरवलेली मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे
सहभागी होण्यास परवानगी
राजकीय पक्षाचे नेते, उमेदवार किंवा कार्यकर्ते व्यक्तिगतरित्या सण / उत्सवात सहभागी होऊ शकतात.
कार्यक्रम पत्रिकेवरील नाव
जर उमेदवार एखाद्या मंडळाचा विश्वस्त किंवा पदाधिकारी असेल, तर त्याचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर राहू शकते. परंतु त्याच्या पक्षाचे नाव, प्रभाग किंवा मतदारसंघाचा उल्लेख करता येणार नाही.
राजकीय सत्कारास मनाई
कोणत्याही सण किंवा उत्सवात राजकीय नेते किंवा उमेदवाराचा सत्कार आयोजित करता येणार नाही.
वाटपावर बंदी
कोणत्याही राजकीय व्यक्तीने सण / उत्सवाच्या निमित्ताने वस्तू, भेटवस्तू, खाद्यपदार्थ, वस्त्र, कीट्स इत्यादी वाटप करू नये. सार्वजनिक मंडळाचा वापर करून वाटप करणे कायद्याने गुन्हा.
बॅनर / पोस्टरवरील नियम
उमेदवाराचा फोटो आणि नाव असू शकते.
परंतु पक्षाचे नाव, प्रचारवाक्य किंवा निवडणूक चिन्ह दाखवता येणार नाही.
भोजनावळ / जेवण कार्यक्रमांवर मनाई
आचारसंहिता कालावधीत सार्वजनिक भोजनावळ, सहभोजन किंवा मेजवानीचे आयोजन करता येणार नाही.
ही सर्व तत्त्वे सार्वत्रिक निवडणुका असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर लागू राहतील.



