IPL 2026 : आयपीएल 2026 साठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. लवकरच आयपीएल 2026 साठी लिलाव देखील होणार आहे मात्र त्यापूर्वी कोणता संघ कोणत्या खेळाडूंना सोडणार आणि कोणाला संघात ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज लिलावापूर्वी 11 खेळाडूंना रिलीज करणार असल्याची चर्चा आहे.
तर भारतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी 2026 मध्ये देखील सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.
आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावापूर्वी सीएसके मोठ्या संख्येने खेळाडूंना सोडू शकते अशी अटकळ आहे. यामध्ये काही प्रमुख खेळाडूंचा समावेश असू शकतो . फ्रँचायझी लिलावात चांगले बदल शोधू इच्छित असेल.
फक्त पाच दिवस शिल्लक
आयपीएलमध्ये खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर असल्याचे सांगितले जात आहे, जरी ती अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. संघाला एक कठीण निर्णय घ्यावा लागेल. कोणाला कायम ठेवायचे आणि कोणाला सोडायचे.
20 कोटी रुपयांचे 11 खेळाडू सोडणार?
सीएसके एकूण 11 खेळाडूंना रिलीज करण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये डेव्हॉन कॉनवेचा समावेश आहे. या खेळाडूंमध्ये राहुल त्रिपाठी, सॅम करन, दीपक हुडा आणि जेमी ओव्हरटन सारखे काही अनुभवी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
सीएसकेच्या संभाव्य रिलीज खेळाडूंची लिस्ट
डेव्हॉन कॉनवे (6.25 कोटी रुपये), राहुल त्रिपाठी (3.40 कोटी रुपये), सॅम करन (2.40 कोटी रुपये), गुर्जपनीत सिंग ( 2.20 कोटी रुपये), दीपक हुडा (1.70 कोटी रुपये), जेमी ओव्हरटन (1.50 कोटी रुपये), विजय शंकर (1.20 कोटी रुपये), श्रेयस गोपाळ (30 लाख रुपये), रामकृष्ण घोष (30 लाख रुपये), कमलेश नागरकोटी (30 लाख रुपये), मुकेश चौधरी (30 लाख रुपये).



