6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Aditi Tatkare : … म्हणून लाडकी बहीणची वेबसाईट स्लो; मंत्री आदिती तटकरे स्पष्टच म्हणाल्या

Aditi Tatkare : महायुती सरकारची लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत काही बदल करण्यात येत असल्याने केवायसीसाठी वेळ लागत असल्याची माहिती महिला व बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीणच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत असल्याने केवायसीसाठी वेळ लागत आहे. ज्या महिलेचा पती किंवा वडील नाही अशांसाठी लाडकी बहीणच्या वेबसाईटमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना अनुदान मिळणार मात्र केवायसीसाठी जो वेळ लागतोय तो लवकरच पूर्ण होईल कोणतेही महिला लाभा पासून वंचित राहणार नाही असं आदिती तटकरे म्हणाल्या.

राजीनामा आणि इतर गोष्टींचा विषय येतच नाही; आदिती तटकरे

तर यावेळी आदिती तटकरे यांनी पार्थ पवार प्रकरणात देखील प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा आणि इतर गोष्टींचा विषय येतच नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, पार्थ पवार (Parth Pawar) प्रकरणात अजितदादांनी (Ajit Pawar) 24 तासांमध्ये स्पष्टीकरण दिला आहे . जो तो विरोधक आपली मत व्यक्त करत असतो राजीनामा आणि इतर गोष्टींचा विषय येतच नाही.

अजित पवार राजीनामा द्या; अंजली दमानिया

तर दुसरीकडे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

पार्थ पवार यांची अमेडिया कंपनीत 99 टक्के भागेदारी आहे मात्र त्यांनी कंपनीत सह्यांचा अधिकारी पाटील यांना दिला आहे. त्यामुळे या जमीन व्यवहाराची माहिती पार्थ पवार यांना पूर्ण होती असा दावा करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री अजित पवार यांच्या मुलावर कारवाई होणार नाही त्यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या