4 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा; आता…

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आता काही बदल करण्यात आल्याने ई-केवायसी आवश्यक आहे. मात्र काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर अनेक अडचणी येत असल्याने लाभार्थी महिलांना या योजनेत केवायसी करण्यास अडचण येत आहे.

तर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ई-केवायसी करण्याची मुदत 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेत ई-केवायसी मुदत वाढवण्यात यावी यासाठी आदेश दिले आहे.

या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या