Vijay Kumbhar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा नाव पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आल्याने पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने 800 कोटी बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये स्टॅम्प ड्युटी न भरता घेतल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुठे समिती स्थापन करण्यात आली होती मात्र त्यांच्या अहवालात पार्थ पवार यांना क्लिन चिट देण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतापले आहे.
तर दुसरीकडे मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना दिलेली “ क्लिन चिट” म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे.
घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLP च्या ठरावावर त्यांची स्वतःची सही आहे.
– जिल्हा उद्योग केंद्राकडून LOI
– करोडोंच्या स्टॅम्प ड्युटीतून सूट
– रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया
प्रत्येक कागद त्यांच्या स्वाक्षरीमुळे शक्य झाला आणि तरीही ते “निर्दोष”! ही चौकशी नाही. हे प्रशासनाने राजकारण्यांशी – घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे.
कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर त्यामुळे क्लिन चिट देणं म्हणजे त्या व्यवहारात थेट सहभागी असणं असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.



