Maharashtra Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध धायरी व दौंड येथे कारवाई करून एकूण 40 लाख 5 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे यांच्या पथकाने धायरी फाटा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (एमएच 12 व्हीएल 0955) वाहनाची तपासणी केली असता गोवा राज्यातील खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात मद्य आढळून आले. यात मॅकडॉवेल नं. 1 व्हिस्की 180 मिली 288 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली 192 बाटल्या, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली 240 बाटल्या असा एकूण रु. 24 लाख 4 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळी अमर पुंडलिक बोडरे (रा. सातारा) व चेतन मधुकर बाटे (रा. नऱ्हे, पुणे) यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान चेतन बाटे यांच्या घरी छापा टाकून मॅकडॉवेल नं. 1, रॉयल स्टॅग व इंपिरियल ब्ल्यू च्या प्रत्येकी 144 बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच गोवा एड्रिएल क्लासिक व्हिस्की (750 मिली) 36 बाटल्या, विविध बनावट बुचे 600 नग, रिकाम्या बाटल्या 192 नग व मोबाईल असा एकूण 1 लाख 18 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या फ्लॅटमध्ये राहणारे आरोपी तुषार सुभाष काळाणे (रा. पुरंदर) यांच्या घरातून गोवा राज्य निर्मित एड्रिएल क्लासिक व्हिस्की 284 बाटल्या, बनावट बुचे – 750 नग व मोबाईल असा एकूण 4 लाख रु. 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण रु. 29 लाख 92 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



