Sri Lanka vs Zimbabwe Highlights : पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असणाऱ्या ट्रॉय सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने शानदार कामगिरी करत श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ फक्त 95 धावांतच गारद झाला. झिम्बाब्वेच्या विजयाचा नायक सिकंदर रझा होता, त्याने 47 धावा केल्या आणि एक महत्त्वाची विकेट घेतली. हा झिम्बाब्वेचा श्रीलंकेवरील तिसरा टी20 विजय होता. या फॉरमॅटमध्ये पूर्ण सदस्यीय संघाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा सर्वात मोठा विजय आहे.
झिम्बाब्वेची खराब सुरुवात
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्ये त्यांनी फक्त 40 धावांत दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यानंतर बेनेट आणि रझा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. बेनेट (49) धावांवर हसरंगाने बाद झाला.
त्यानंतर झिम्बाब्वेने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 162 धावा केल्या.
श्रीलंकेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 47 धावा केल्या, तर वानिंदू हसरंगाने (3/32) आणि इशान मलिंगा (2/27) यांनी शानदार गोलंदाजी केली.
श्रीलंकेने 25 धावांत तीन गडी गमावले
163 धावांचा बचाव करताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. रिचर्ड नगारावा पहिल्याच षटकात पथुम निस्सांकाला बाद केले. कुसल परेरा दुसऱ्या षटकात टिनोटेंडा मापोसाने बाद झाला, तर कुसल मेंडिस सातव्या षटकात धावबाद झाला, ज्यामुळे श्रीलंकेने 25 धावांवर 3 विकेट गमावल्या.
त्यानंतर ब्रॅड इव्हान्सने श्रीलंकेला दबावाखाली ठेवले. त्याने भानुका राजपक्षेचा विकेट घेतला. नंतर इशान मलिंगा आणि महेश थीकशनाचे बळी घेतले. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सने तीन आणि नगारावाने दोन विकेट घेतल्या.



