Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांनी उचांक गाठला आहे. शहरासह उपनगरांत विविध गुन्ह्यांची मालिका समोर येत असताना काही दिवसांपूर्वी पुण्यात भडकलेल्या टोळीयुद्धानं नागरिकांची झोप उडवली होती.
या टोळीयुद्धात आंदेकर टोळीने आयुष कोमकर आणि गणेश काळे या दोन तरुणांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. गोळ्या झाडणं, कोयत्याचे सपासप वार आणि त्यातून झालेले दोन तरुणांचे मृत्यू या रक्तरंजित घटनेनंतर पुणे शहर हादरून गेलं. मात्र या संपूर्ण प्रकरणी पुणे पोलिसांनी सुप्रीम अॅक्शन घेतलं आहे. हत्येप्रकरणी आंदेकर टोळीतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
एवढंच नाही तर आरोपींची धिंड काढत त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्नही केला. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांचा हा कडक इशारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, पुण्यातील फुरसुंगी परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी भर रस्त्यात थर्ड डिग्री देत दहशत माजवणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
पुण्यात पुन्हा गुन्हेगारी माफियांची दहशत वाढू नये. यासाठी पोलिसांची कारवाई पुढे कशी होते. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



