6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Girish Mahajan : ‘दोन नंबरवाल्यांना सत्ता देऊ नका’ मंत्री गिरीश महाजन यांची नाव न घेता किशोर पाटलांवर टीका

Girish Mahajan : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली.

भडगावची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषदांपेक्षा सर्वात खराब असून शहरात “दोन नंबरचे धंदेवाले” पुढे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाजन म्हणाले की, विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटन वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली असून अशा लोकांच्या हाती शहराचे नेतृत्व देणे धोक्याचे आहे.

जामनेर-चाळीसगावमध्ये मोठी विकासकामे होत असतानाही भडगावमध्ये टक्केवारीचे व्यवहार आणि अकार्यक्षमता सुरू असल्याचेही ते म्हणाले. शहराचा निर्णय आता जनतेने बदलाच्या दिशेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी सभेच्या शेवटी करत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या