6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराडला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही; संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर भडकले

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक वर्षपूर्ण झाले असून मात्र अद्याप देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आजही आठवणीने देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.

या प्रकरणात एक आरोपी अजूनही फरार असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

एक वर्षानंतरही आजही देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. न्यायालयीन लढाईमध्ये त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत. त्यामुळं वाल्मीक कराड याला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही, असं आमदार संदीप क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच येणाऱ्या 12 तारखेला आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली.

तर दुसरीकडे आठवण या पावले पावले येतात कुठल्या आठवणी सांगायच्या असं म्हणत वैभवी देशमुखला भावना अनावर झाल्या. एक वर्षात न्याय मिळाला नाही, याची खंत व्यक्त करत आठवणी प्रत्येक क्षणाला येतात. वडिलांनी आमच्यासाठी कमी भावासाठी समाजासाठी स्वप्न पाहिलं होत, त्यांचा विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. असं माध्यमांशी बोलताना वैभवी देशमुख म्हणाल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या