6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Natsamrat Balgandharva Award : सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, भाऊ कदम यांच्यासह कुमार शानू यांना 25वा “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” प्रदान

Natsamrat Balgandharva Award : साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित 25 व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांचं वितरण नुकतंच मुंबईत करण्यात आलं त्यावेळी केंद्रीय सास्कृतिककार्य मंत्री शेखावत बोलत होते. 2025 ला “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” सोहळ्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा हा पुरस्कार सोहळा खूपच खास होता.

अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहात “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते.

गायन विभागात या पुरस्काराचे मानकरी ठरले कुमार सानू, पियुष पनवर, कुमार सानू यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर केलेल्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.

सेवा रत्न पुरस्कारमध्ये सुहास दिवसे (जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे), एम.आय.डी.सी. चे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि महापारेषणच्या कार्यकारी संचालक सुचिता भिकाने यांनाही त्यांच्या प्रशासकीये सेवेतल्या योगदानासाठी सेवा रत्न पुरस्कारने गौरवण्यात आले.

तर धर्मप्रचार आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

“नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” दत्तात्रय माने यांच्या नेतृत्वाखाली साईदिशा प्रतिष्ठान गेल्या 24 वर्षांपासून काम करत आहे. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या नावे “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो.. यावर्षी पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता.

ज्या काळात स्त्री नटी म्हणून नाटकात अभिनय करू शकत नव्हती अशावेळी बालगंधर्वांनी रंगमंचावर लक्षणीय स्त्री उभी केली. ए.आय. कितीही पुढारलं तर माणसाची जागा घेऊ शकणार नाही असं अभिनेते मकरंद देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितलं.

आपल्या घरच्यांची केलेला सन्मान खूप जास्त जवळचा असल्याचं म्हणत अभिनेत्री सई ताम्हनकर यांनी आयोजकांचे आभार मानले. तर भाऊ कदम यांनीही बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानतानाच साईदिशा प्रतिष्ठान आणि दत्तात्रय माने यांचाही विशेष उल्लेख केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या