Amravati News : अमरावती शहरात बॉम्बस्फोट करणार असा निनावी कॉल अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षात धडकल्याने अमरावती शहरात रात्री पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अशात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांनी तात्काळ सूत्रे हलविली. सर्व पोलीस स्टेशनं पोलिसांना तात्काळ अलर्ट करून शहरातील चौकात नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली.
इकडे सायबर पोलीस त्या निनावी धमकी कॉल च्या लोकेशन शोधात लागले. कॉलचे लोकेशन इंदोर येथे आढळून आल्याने अखेर इंदोर पोलिसांना माहिती देण्यात आली. इंदोर पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेऊन रात्रीच ताब्यात घेतले. या दरम्यान शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व पथक इंदोर रवाना होऊन रविवारी सकाळी आरोपीला अमरावतीत आणण्यात आले.
सोहेल पांडुरंग शेख वय 33 राहणार रहाटगाव असे धमकी देणाऱ्या आरोपी चे नाव आहे. सोहेल याच्या विरुद्ध याने या आधी अशीच पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल केल्याने त्याच्या विरुद्ध नागपुरी गेट पोलिसात गुन्हा दाखलं होता.आरोपीला बॉम्ब ची धमकी का दिली हे विचारलं असता यावर आरोपी सोहेल शेख पोलिसांना उडवा उडविची उत्तरे देत आहे. या प्रकरणावर शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घटनेची माहिती स्पष्ट केली.



