Virat Kohli : रांची येथे झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून या सामन्यात विराट कोहली हिरो ठरला आहे. त्याने 52 वे एकदिवसीय शतक झळकावले. तर दुसरीकडे त्याच्या या खेळीनंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये परतणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आता स्वतः कोहलीने यावर स्पष्टीकरण दिले.
कसोटी क्रिकेट खेळणार नाही
प्रेझेंटेशनदरम्यान त्याचे भविष्य फक्त एकदिवसीय क्रिकेटपुरते मर्यादित राहील का असे विचारले असता, कोहलीने संकोच न करता उत्तर दिले, हो, आणि ते नेहमीच असेच राहील. मी आता फक्त एकाच स्वरूपात खेळत आहे, त्यापलीकडे काहीही नाही असं कोहली म्हणाला.
कोहलीने स्पष्ट केले जर तुम्ही सुमारे 300 सामने खेळला असाल, तर तुम्हाला माहिती असेल की तुमच्याकडे दीर्घकाळ फलंदाजी करण्याची शारीरिक क्षमता आहे. जोपर्यंत तुम्ही चेंडूला चांगला मारत आहात तोपर्यंत ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या तयार आणि उत्साहित असण्याबद्दल आहे. कोहलीच्या विधानाने हे स्पष्ट केले की तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे.
कोहलीने 52 वे एकदिवसीय शतक झळकावले
रांची एकदिवसीय सामन्यात विराट कोहली सुरुवातीपासूनच आक्रमक होता. त्याने 120 चेंडूत 135 धावांची रोमांचक खेळी केली, ज्यामध्ये 7 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. या खेळीमुळे भारताला 17 धावांनी विजय मिळाला आणि मालिकेत1-0 अशी आघाडी मिळाली.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. विराट कोहलीच्या 135 धावांव्यतिरिक्त, रोहित शर्माने 57 आणि कर्णधार केएल राहुलने 60 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 32 धावा केल्या. मॅथ्यू ब्रिएट्झकेच्या 72 धावा, मार्को जॅन्सेन (39 चेंडू) च्या 70 धावा, तीन षटकार आणि आठ चौकारांसह आणि कॉर्बिन बॉश (51 चेंडू) च्या 67 धावा आणि पाच षटकारांसह, दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.2 षटकांत 332 धावांवर आटोपला आणि सामना 17 धावांनी गमावला.



