Vikas Gogawale : राज्यातील 200 पेक्षा जास्त नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान असून 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात घरच्या बाहेर निघून मतदानाचा हक्क बजावला आहे.
तर दुसरीकडे रायगडच्या महाड नगरपरिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया दरम्यान प्रभाग क्रमांक दोनच्या तीन नंबर मतदान केंद्रावर जवळपास दोन ते अडीच तास EVM मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
तर दुसरीकडे यावेळेस शिवसेनेचे विकास गोगावले व राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या दरम्यान मतदार पुरावा संदर्भात नोंदवलेल्या हरकतीमुळे या दोन राजकीय गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची व मारहाण झाली आणि काही काळ तणाव निर्माण झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुशांत जाबरे यांला मारहाण केली, त्यामुळे वाद अधिकच चिघलला. दोन गटात झालेल्या मारहाणी मुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद संपवला. तर या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र आतापर्यंत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
21 डिसेंबरला मतमोजणी
तर दुसरीकडे आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर 21 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.



