6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Karad Accident : कराडमध्ये भीषण अपघात ; 50 विद्यार्थ्यांसह 57 जखमी…

Karad Accident : नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक कोकण दर्शन सहलीचा उत्साह आनंद आणि सोनेरी आठवणीचा प्रवास परतीच्या मार्गावर असताना पहाटेच्या वेळेस पुणे बेंगळुरू राष्ट्रीय मार्गावरील कराड जवळील बुवाचे वॉटर येते झालेल्या भीषण अपघाताने हादरले.

अपघाताची बातमी पिंपळगाव शहरात येताच पालकांसह महाविद्यालय व्यवस्थापनाची धावपळ उडाली. सहलीच्या खाजगी बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली या अपघातात 50 विद्यार्थ्यांसह चालक दोन शिक्षक आणि चार आचारी असे 57 जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही दरम्यान मंत्री आमदार जिल्हाधिकारी यांच्याकडून रुग्णालयात जाऊन विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी फोटोशूट करत सुंदर आठवणी सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.

पुण्यात रस्ते अपघातात वाढ

दोन दिवसांपूर्वी हिंजवडीत लक्ष्मी चौकात तीन चिमुकल्या भावा-बहिणीला आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर आता पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी रात्री एका मद्यधुंद गाडीचालकाने अक्षरशः जीवाशी खेळ मांडला. एक व्यक्ती मद्य सेवन करून आपली किया गाडी चालवत होता. अति वेगामुळे गाडीचा टायर निखळला, तरीही चालक गाडी थांबवण्याऐवजी भरधाव वेगात ती चालवत राहिला, ज्यामुळे पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला हा थरार कल्याणी नगरपासून ते पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत सुरू होता. हे सर्व व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या