6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Malvan Police : मालवणीतील पोलिसांशी धक्का-बुक्की प्रकरण, पाच आरोपींची काढली धिंड

Malvan Police : नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मालवणी परिसरात 2 डिसेंबरच्या उशीरा रात्री पोलिसांशी धक्का-बुक्की आणि शिवीगाळ करणाऱ्या काही गुंडांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी राहिल कोटक अजूनही फरार आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये राहिल कोटक, पीयूष कोटक आणि काही साथीदार ऑन-ड्युटी पोलिसांशी उर्मटपणे वाद घालताना दिसतात. पोलिसांना ढकलणे आणि कायदा हातात घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. घटनेनंतर पीयूष कोटकसह तिघांना रातोरात अटक करण्यात आली.

अटकेत घेतलेल्या काहींना शर्टलेस अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दृश्यही समोर आले. फरार राहिल कोटकचा शोध सुरू असून तपास वेगाने पुढे जात असल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या