Amravati Crime : अमरावती शहरातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कामुंजा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणावर छापा टाकला असता, तेथे कुंटणखाना सुरू असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत कुंटणखाना चालवणारी महिला, तीन तरुणी तसेच दोन ग्राहकांना ताब्यात घेतले.
संबंधित व्यक्तींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याची माहिती संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक शहर गुन्हे शाखा यांनी दिली.
तर या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर पोलीसांची नजर अधिक कडक झाले असं देखील संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक शहर गुन्हे शाखा म्हणाले.



