IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. बीसीसीआयकडून खेळाडूंची लिलाव यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्या खेळाडूवर सर्वात जास्त बोली लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता बीसीसीआयने अनेक खेळाडूंना मोठा धक्का देत 350 खेळाडूंची बोलीसाठी निवड केली आहे.
यापैकी 40 खेळाडूंनी 2 कोटी रुपयांच्या सर्वोच्च बेस प्राईस श्रेणीसाठी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या लिलावात फक्त 77 खेळाडूंना मालक मिळणार आहे. त्यापैकी 31 विदेशी खेळाडू असणार आहे.
यावेळी, एकूण 1390 खेळाडूंनी नोंदणी केली आहे, परंतु कठोर छाननीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 350 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये 240 भारतीय आणि 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
आयपीएल लिलाव कधी सुरू होईल?
आयपीएल 2026 चा लिलाव 16 डिसेंबर रोजी होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा लिलाव अबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे होणार आहे आणि भारतात त्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लिलाव पाहू शकतात.
आयपीएल 2026 च्या लिलावासाठी 350 खेळाडूंच्या यादीत नवीन नावे जोडली गेली आहेत.
विदेशी खेळाडू
अरब गुल, माइल्स हॅमंड, डॅन लाटेगन, क्विंटन डी कॉक, कॉनर आयज्टरहुइझेन, जॉर्ज लिंडे, बायंडा माजोला, ट्रॅव्हिन मॅथ्यूज, बिनुरा फर्नांडो, कुसल परेरा, दुनिथ वेलागे, अकीम ऑगस्टे.
भारतीय खेळाडू
सादेक हुसेन, विष्णू सोळंकी, साबीर खान, ब्रिजेश शर्मा, कनिष्क चौहान, आरोन जॉर्ज, जिक्कू ब्राइट, श्रीहरी नायर, माधव बजाज, श्रीवत्स आचार्य, यशराज पुंजा, साहिल पारिख, रोशन वाघसरे, यश डिचोलकर, अयाज खान, धुर्मुष वालकर, पुष्कळ मातब्बर, पुष्कळकर, ना. अग्रवाल, ऋषभ चौहान, सागर सोलंकी, इजाज सावरिया आणि अमन शेकावत.



