4 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Maharashtra Crime: भर दिवसा घरफोडी अन् 82 हजार किंमतीचे दागिने चोरी; आरोपीला अटक

Maharashtra Crime : दिवसा घरात कोणी नसणाऱ्या घरांची, दरवाज्याला कुलूप असणाऱ्या घरांची रेकी करून अवघ्या काही मिनिटात दरवाज्याचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून व पैसे घेऊन पसार होणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या 40 वर्षाच्या आरोपीला वागळे पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे,

वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीत मधील एकता रहिवाशी संघटना चाळ, अंबिका नगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर वय 41 या आपल्या घराच्या खोलीस कुलूप लावून कामावर गेल्या असता, कोणीतरी चोरट्याने घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून 82,000 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरी करून नेले या बाबतची तक्रार त्यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे 27/12/2025 केली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या प्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम,सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रविण सावंत व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली, गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचे सिसिटीव्ही, गुप्त बातमीदारपासून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी हा तिन हाथ नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी साफळा रचून आरोपी दीपक रामगोपाळ वैश्य राहणार शिवाजी नगर, गोवंडी याला ताब्यात घेण्यात आले, त्याची कसून चौकशी केली.

त्याच्या विरुद्ध 15 घरफोडी चे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले,तसेच त्याच्या कडून एकुण 31,480 ग्रॅम सोने, 8 ग्रॅम चांदी व रोख रक्कम 75,500 रुपये असा एकुण 1,92,500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, या आरोपी विरोधात यापूर्वी मुंबईतील 15 विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या