Mitchell Starc : ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने काही दिवसांपूर्वी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना धक्का दिला होता मात्र आता त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती का? घेतली याबाबत मोठा खुलासा केला आहे.
मिचेल स्टार्कने कॉफी विथ कॉग्सला सांगितले, “आशा आहे की, मी 2027 मध्ये भारत आणि इंग्लंडचा दौरा करू शकेन. कदाचित म्हणूनच मी टी20 क्रिकेट सोडले. तर, हो, ती योजना आहे. तसे झाले की नाही, माझे शरीर मला सांगेल. पण मला ते नक्कीच करायचे आहे.”
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील प्रमुख गोलंदाज आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकून त्याने हे सिद्ध केले आहे.
2025 च्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्टार्कने 18 विकेट घेतले आहेत, तर इतर कोणत्याही गोलंदाजाला अद्याप 10 विकेट्सचा टप्पा गाठता आलेला नाही. पहिल्या कसोटी सामन्यात स्टार्कने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली, एका डावात 7 विकेट्स घेतले आणि एकूण 10 विकेट्स घेतले. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 8 बळी घेतले.
भारत आणि इंग्लंड दौऱ्यांव्यतिरिक्त स्टार्क 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करेल. हा निश्चितच त्याचा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असू शकतो.



