Grand Vitara Discount: देशाची सर्वात मोठी ऑप्टो कंपनी मारुती सुझुकीची ग्रँड विटारा हायब्रिडसाठी देशात तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. भन्नाट फिचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे या कारची भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. यातच जर तुम्ही देखील ग्रँड विटारा हायब्रिड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या कारवर तब्बल 2.40 लाखांचा डिस्काउंट देण्यात येत आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा हायब्रिड पेट्रोल व्हेरिएंटवर 2.40 लाखांपर्यंतची सूट दिली जात आहे. यामध्ये 75,000 ची रोख ऑफर, 50,000 ची एक्सचेंज ऑफर, 40,000 ची अतिरिक्त सूट, 25,000 ची कॉर्पोरेट सूट आणि 50,000 ची अपग्रेड ऑफर समाविष्ट आहे. तसेच यामध्ये 5 वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील समाविष्ट आहे.
तर दुसरीकडे मारुती सुझुकी ग्रँड विटारा सीएनजी व्हेरिएंटवर 1.40 लाखांपर्यंतची सूट दिली जात आहे. यामध्ये 35,000 ची रोख ऑफर, 20,000 ची एक्सचेंज ऑफर, 40,000 ची अतिरिक्त सूट, 25,000 ची कॉर्पोरेट सूट आणि 20,000 ची अपग्रेड ऑफर समाविष्ट आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या झेटा, अल्फा पेट्रोल, 4 डब्ल्यूडी, सिग्मा पेट्रोल आणि डेल्टा पेट्रोल व्हेरिएंटवर देखील अशाच प्रकारच्या सूट उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची सुरुवात 10.76 लाख (एक्स-शोरूम) पासून होते. या एसयूव्हीच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 19.72 लाख (एक्स-शोरूम) आहे.



