Maharashtra Election: राज्यातील 29 महापालिकेसाठी आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत आगामी 29 महानगर पालिका निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करणार असून 20जानेवारी पर्यंत 29 महानगरपालिका पूर्ण होणार आहे.
तर दुसरीकडे राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल देखील राज्य निवडणूक आयोग आपली भूमिका या पत्रकार परिषदेत स्पष्ट करू शकते. राज्यातील 24 नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली होती.
21 डिसेंबर रोजी राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत महायुतीमधील दोन्ही घटक पक्ष भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात पाहायला मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून झालेल्या फोडफडीच्या राजकारणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नाराज झाल्याची माहिती समोर आली होती आणि या प्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केली असल्याची माहिती आहे.



