Prithviraj Chavan On Operation Sindoor : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून केवळ राज्याचे नाहीतर देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनल आहे. त्यांनी दावा केला आहे की, 19 डिसेंबर मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
तर दुसरीकडे आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर चारही बाजूने टीका होताना दिसत आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पूर्णपणे पराभव झाला होता. 7 तारखेला अर्धा तास हवाई युद्ध झाले आणि भारताचा पूर्णपणे पराभव झाला, लोक मानत असो वा नसो. युद्धादरम्यान भारतीय विमान पाडण्यात आले. हवाई दल जमिनीवर होते आणि एकही विमान उडत नव्हते. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते तर पाकिस्तानने ते पाडले असते असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आम्ही पाहिले की हवाई दल एक किलोमीटरही पुढे सरकले नाही. दोन-तीन दिवसांत जे काही घडले ते सर्व हवाई आणि क्षेपणास्त्र युद्ध होते असं देखील ते म्हणाले.
सशस्त्र दलांचा अपमान करणे काँग्रेसची सवय; गिरीराज सिंह
तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री गिरीराज सिंह यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करत सशस्त्र दलांच्या शौर्याचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे करणारे कधीही राष्ट्रीय हिताचा विचार करू शकत नाहीत. सशस्त्र दलांचा अपमान करणे ही काँग्रेस पक्षाची सवय बनली आहे असं म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने7७ मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” ही लष्करी कारवाई सुरू केली.
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईत भारताने 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले होते.



