6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Rahuri By Election : राहुरी विधानसभेत लवकरच पोटनिवडणूक; आयोगाकडून तयारी सुरू

Rahuri By Election : विधानसभा सदस्य कै. शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ नुसार या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे.

यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ठेवण्यात आला आहे.

प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य  निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे नुकतंच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शानदार कामगिरी करत 288 पैकी 123 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांना या निवडणुकीत 15 पेक्षा कमी जागा मिळाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या