Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये वार्ड 10 मधील भाजपाच्या उमेदवार सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा भालेराव होत्या त्यांनी माघार घेतल्यामुळे चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या आधी भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपने माजी नगरसेवक रवी लांडगे बिनविरोध झाले आहे. प्रभाग 6 मध्ये अपक्ष उमेदवार प्रसाद काटे यांचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा अर्ज जात प्रमाणपत्र सादर न केल्याने नामंजूर करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसने संतोष काळुराम लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र त्यांचा अर्जच दाखल न झाल्याने ते निवडणूक रिंगणाबाहेर राहिले होते. यामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये रवी लांडगे बिनविरोध झाले.
विशेष म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीतही रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली होती.



