Pune Crime : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉज मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज मराठे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली पोलिस दलात तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या 25 वर्षाचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती.
पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले आणि त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.



