Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील हा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यात तो एक नंबरचा माहीर आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते कार्यकर्ते याच्यासाठी जीव ओवाळून टाकणारे होते. मात्र इम्तियाज जलीलने पैसे घेऊन तिकीटे विकली आणि त्या कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले. त्यामुळेच आज कार्यकर्ते आपला संताप व्यक्त करत आहेत.
“जैसी करणी, वैसी भरणी” हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळाले आहे. जे “शेर आया, शेर आया” म्हणत होते, त्याच इम्तियाज जलीलला आज पळावे लागत आहे. “जनता मेरे साथ है” म्हणणारा आज शेपूट घालून पळत आहे, आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.
इम्तियाज जलीलने जे केले, त्याची किंमत त्याला मोजावी लागत आहे. पोलीस संरक्षणात गुंड पाठवण्याची गरज नाही. ज्यांनी दगडफेक केली किंवा हल्ला केला, त्यांना पोलिसांनी पकडून का मारले याची चौकशी केली पाहिजे.
“माझे कोणी वाकडे करू शकत नाही, ओवेसी माझ्यासोबत आहे,” अशी जी इम्तियाज जलीलची मस्ती होती, त्याचे उत्तर आज त्याला मिळाले आहे. ओवेसी भडक भाषण करून मुस्लिम समाज माझ्यासोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, मात्र त्याला उत्तर कार्यकर्त्यांनी आधीच दिले आहे अशी टीका राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केली आहे.
तर दुसरीकडे एका प्रभागात प्रचार करताना इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाठ आणि अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याचा आरोप केला होता.



