2.8 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

Pune Election: पुण्यात अजितदादांना मोठा धक्का; भाजपने बोलल्याप्रमाणे आकडा गाठला

Pune Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणेकरांनी मोठा धक्का दिला आहे. भाजपने या निवडणुकीत तब्बल 119 जागा जिंकत स्वबळावर बहुमत मिळवला आहे.

आम्ही या निवडणुकीत 120-125 जागा जिंकणार असा दावा पुण्यात भाजपकडून करण्यात येत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता मात्र त्याचा काहीच फायदा पक्षाला झाला नसल्याने आता स्पष्ट झाले आहे.

तर दुसरीकडे पुण्यात युतीसाठी अनेक प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात खात देखील उघडता आलं नाही. तर शिवसेना ठाकरे गटाने एका जागेवर बाजी मारली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 15 जागा जिंकल्या आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाले आहे.

शरद पवार पक्षाची कामगिरी या निवडणुकीत खराब राहिल्याने येणाऱ्या दिवसात पुण्यातील राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. कधीकाळी बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

तर दुसरीकडे पुण्यात आता भाजपकडून महापौर पदासाठी संधी कुणाला मिळणार याबाबत राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

एकूण जागा 165

भाजप- 119

शिवसेना -0

ऊबाठा-1

राष्ट्रवादी शरद पवार -3

राष्ट्रवादी अजित पवार – 27

काँग्रेस -15

एमआयएम-0

अपक्ष-0

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या