2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

Pune Politics: आमदार बापू पठारेंचा मुलगा-सूनबाई महापालिकेत आता दोन्ही मुलीही जिल्हा परिषदेच्या रिंगणात…

Pune Politics: वडगावशेरीचे विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार) आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सुनबाई ऐश्वर्या पठारे पुणे महापालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आता त्यांच्या दोन्ही मुली देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

एक मुलगी पूनम अमोल झेंडे पुरंदर मधील दिवे गराडे या गटातून राष्ट्रवादीकडून (अजित पवार) उभी आहे. तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडून लढत आहेत. दिवे गराडे गटातून निवडणूक लढवत असलेल्या पूनम झेंडे या IPS अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत.

तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून दिपाली गव्हाणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सारिका करपे आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) रेखा बांदल यांच आव्हान असणार आहे. रेखा बांदल या मंगलदास बांदल यांच्या पत्नी आहेत. तर पूनम झेंडे या आपले पती पीएमआरडीएचे sp अमोल झेंडे यांच्या गाव परिसरातील दिवे गराडे गटातून निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, बापूसाहेब पठारे हे स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत तर मुलगा आणि सूनबाई भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत आता त्यांच्या दोन्ही मुलीची जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या