4.8 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

Chhatrapati Sambhajinagar : दिवसा गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

Chhatrapati Sambhajinagar : दिवसा गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धिंड काढली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 26 अंतर्गत प्राणघातक हल्ला आणि गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरू असून, त्यातील सात अटक आरोपींना स्थळ पाहणीसाठी बाहेर काढण्यात आले. आरोपी कुठे लपले होते, त्यांनी काय केले, याबाबत तपासासाठी ही पाहणी करण्यात आली. पुढील कारवाईसाठी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम जाट याच्यावर पुंडलिक नगर, जवाहर नगर, करमाड तसेच इतर पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपींवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत प्रत्येकी दोन-दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

कोणत्याही गुंडाच्या दहशतीखाली नागरिकांनी राहू नये. गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या