19 C
New York
Wednesday, April 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Gold prices : मोठी बातमी; सोन्याचे भाव ५८ हजारांनी कोसळणार ; भारतातील दर एक लाखांच्या खाली येणार?

मोठी बातमी; सोन्याचे भाव ५८ हजारांनी कोसळणार ; भारतातील दर एक लाखांच्या खाली येणार?

अहिल्यानगर –  (Gold Investment) गोल्डमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना २०२५ मध्ये घसघशीत परतावा मिळाला. 2026 च्या सुरुवातीच्या काळातही हि सोन्याची तेजी कायम राहिली.2026 च्या जानेवारीमध्ये MCX वर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,80,779 या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, सध्या बाजाराचा कल फिरणार असल्याचं पाहायला मिळतंय. मागील शुक्रवारी हा दर तब्बल 13.50 टक्क्यांनी घसरून 1,56,000 नी खाली आला. त्यानंतर कालही , सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजीही एमसीएक्सवर (MCX) सोने 0.61 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं.

रशियाच्या अमेरिकन डॉलरच्या बदललेल्या भूमिकेमुळे सोन्याच्या भावात ही मोठी घसरण झाली असं बुलियन तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान, येत्या काळात भारतात सोन्याचा दर हा एक लाखांच्या खाली येऊ शकतो अशी शक्यताही काही तज्ञानी व्यक्त केली आहे.

दरम्यान, लाइव्ह मिंटने (Live Mint)एक अहवाल दिला आहे ज्यात रशिया पुन्हा एकदा अमेरिकेसोबत अमेरिकन डॉलर (USD) मध्ये व्यापार करण्याच्या शक्यता तपासत असल्याचं नमूद केलंय. आश्चर्य म्हणजे रशिया दीर्घकाळापासून ‘डी-डॉलरायझेशन’ (Dollar) म्हणजेच डॉलरविरहित व्यापार या मोहिमेचे नेतृत्व करत होता. जर रशियाने आपला मोर्चा पुन्हा डॉलरकडे वळवला, तर ब्रिक्स (BRICS) देशांनी मांडलेल्या सोन्यावर आधारित व्यापार या संकल्पनेतून निर्माण झालेली सोन्याची मागणी कमी होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप तरी रशियाने हा रिपोर्ट फेटाळला नाही. रशियाची ही शांतता येत्या काळात सोन्याचे भाव ठरवेल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. Updated Golden prices

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या