20.1 C
New York
Thursday, July 23, 2026

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरात महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; बेग बंधू सह एका वर गुन्हा

श्रीरामपूर ( अहिल्यानगर अपडेट 24)  :-कोपरगाव येथील एका महिलेवर श्रीरामपूर शहरात धाकदपटशा करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर बेग, त्याचा भाऊ सोनू बेग आणि बाबू साळवे यांच्याविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पीडित महिलेने बुधवारी सकाळी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. कथित अत्याचाराच्या घटना श्रीरामपूर शहरात घडल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता काही दिवसांसाठी श्रीरामपूर येथे तिच्या आजीकडे आली असताना तिची बाबू साळवे याच्याशी ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेत जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत साळवे याने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, पीडितेला सुमारे ४० दिवस एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. या काळात सागर बेग आणि सोनू बेग यांनी बंदुकीचा धाक दाखवून बाबू साळवे याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सोनू बेग याच्याविरुद्ध यापूर्वी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तो सध्या अन्य गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. त्याच्यावर अलीकडेच शस्त्रास्त्र कायद्यान्वयेही गुन्हा नोंद झाला आहे. बाबू साळवे याच्याविरुद्धही खून, विनयभंग आणि शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाचा तपास श्रीरामपूर शहर पोलिस करत आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या