Aaditya Thackeray: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी आलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन सादर केले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
आम्ही स्वतः शाखा-शाखेत जाऊन मतदार याद्यांवर काम करत आहोत. दरम्यान काही भागात धमक्या देणे, पैशांच्या बॅगा फिरवणे असे प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. ही निवडणूक नसून ‘सेलेक्शन’ सुरू आहे.
-प्रारूप मतदार यादीत भीषण गोंधळ 20 नोव्हेंबरनंतर उघड
-जवळपास 14 लाख दुबार मतदार, तर आयोगाचा आकडा फक्त 11 लाख
-प्रत्येक वॉर्डमध्ये 3-4 हजार हरकती आधीच दाखल
-86 लाखांवर दुबार शिक्का, परंतु अनेक वास्तविक मतदारांना कोणतीही स्टार नोंद नाही
-सुनील शिंदे, श्रद्धा जाधव यांसारख्या मोठ्या नेत्यांची 7–8 वेळा नावे
-मृत मतदारांची नावे कायम – प्रॉक्सी मतदानाचा संशय 33 हजार नवी नावे चुकीने समाविष्ट (1 जुलै 2025 नंतरच्याही नोंदी)
-अनेक BLO अपात्र – वाचता-लिहिता न येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे तपासणीची जबाबदारी
-मराठी मतदारांचे सर्वाधिक दुबार नावांमध्ये प्रमाण
-हरकतींसाठी किमान 7 दिवसांची वाढ मागणी
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने तातडीने दुरुस्ती करून मुंबईकरांचा मतदानाचा हक्क सुरक्षित करावा, अशी मागणी केली. अन्यथा हा व्यापक गोंधळ लोकशाही प्रक्रियेसाठी धोकादायक असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
तर दुसरीकडे आज उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामुळे आता राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.



