6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरमध्ये खळबळ, मनसेचे दोन उमेदवार गायब; प्रतिस्पर्ध्यांकडून अपहरण?

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महापालिकेसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता जोरदार प्रचाराची तयारी देखील राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगरच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार,महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब झाले आहे. केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे. या दोन्ही उमेदवारांचा गेल्या चोवीस तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे.

केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे.

दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. या घटनेचा तपास करा या मागणीसाठी

मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलिसांनी स्टेशनमध्ये दाखल झाले आहे.

दरम्यान अर्ज माघारी घेण्यासाठी उद्या 2 जानेवारी रोजी अंतिम दिवस असून त्यापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या