6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Ahilyanagar News : शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत अनेक भागात पुरवठा विस्कळीत

Ahilyanagar News : विज वितरण कंपनी कडून शहर पाणी पुरवठा योजने करिता होणाऱ्या विज पुरवठ्या मध्ये बिघाड निर्माण झाल्याने सोमवार दि.१२/०१/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजले पासुन आज पहाटे ४.३० वाजेपर्यंत विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलग आठ तास पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत त्यामुळे मंगळवार दि.१३/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने म न पा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही.

या भागातील पाणी पुरवठा हा बुधवार दि. १४/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच बुधवार दि.१४/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो गुरुवार दि.१५/०१/२०२६ रोजी करण्यात येईल.

तसेच सर्व उपनगर भागामध्ये रोटेशन पेक्षा उशीराने पाणी पुरवठा होणार आहे . तरी नागरीकानी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या