6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : MIM ची मोठी खेळी; एकाच वेळी अहिल्यनगर महापालिकेसाठी 4 उमेदवारांची घोषणा

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा करत प्रभाग क्रमांक 4 साठी उमेदवारांची घोषणा केली आहे. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. तर लवकरच दुसरी यादी देखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमकडून देण्यात आली आहे.

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून माजी नगरसेवक समद खान यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, शेहबाज सय्यद आणि सलमा शेख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शहरात सभा घेत अहिल्यानगर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेसाठी एमआयएमकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून अहिल्यानगर महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली असून चार जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे.

अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या