6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

निवडणुकीबाबत मुख्यमंत्री जे बोलणार ते फायनल असेल, अजित पवार असं का म्हणाले?

Pune Municipal Election: राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा करत पुणेसह राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केले आहे. यामुळे आता प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. महायुतीमधील घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना राज्यातील काही ठिकाणी युती म्हणून तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती होणार नसून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असं म्हटलं आहे. तर आता युतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत जे मुख्यमंत्री म्हणणार ते फायनल होणार असं म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जर मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले असेल तर त्यांनी काळजीपूर्वक विचार केला असेल. मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत. ते जे काही बोलतील ते अंतिम असेल.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, भाजप आणि शिवसेना बहुतेक मतदारसंघांमध्ये आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढतील आणि बहुतेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह “महायुती” मित्रपक्षांसह जागावाटपाची व्यवस्था अंतिम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल, असे ते म्हणाले होते.

तसेच ‘महायुती’च्या मित्रपक्षांमध्ये युती होईल, परंतु बहुतेक शहरांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत युती होईल.

पुणेसह महाराष्ट्रातील 29 नगरपालिका संस्थांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होतील आणि मतमोजणी 16 जानेवारी रोजी होईल होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतधील घटक पक्ष अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या