Ambernath Accident : अंबरनाथ उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. अपघातात (Ambernath Accident) सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
किरण चौबे या अंबरनाथ नगरपालिका (Ambernath Municipal Election) निवडणुकीत बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. प्रचार संपून घरी जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही दुर्घटना तेव्हा घडली, जेव्हा कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकीस्वारांना कारने जोरदार धडक दिली. या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे, तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एका पाचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी असून किरण चौबे देखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. या प्रकरणाच्या तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत नक्की अपघाताची कारण काय याचा तपास आता सुरू असल्याची माहिती सचिन गोरे, डीसीपी, उल्हासनगर यांनी दिली.



