6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Asaduddin Owaisi: महापौर नगरचा MIM च ठरवेल ; महिलांची ताकद MIM सोबत असदुद्दीन ओवैसींचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांनी अहिल्यानगरमध्ये झालेल्या सभेत सत्ताधारीवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी थेट आव्हान दिलं काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून दाखवा. पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांपासून दूर रहा.पैशेवाटपावर त्यांनी उपरोधिक टोला लगावला कोणी पैसे वाटत असेल तर घ्या, पण त्या पैशातून त्यांच्याच नावाने शौचालय बांधा

महिलांच्या भूमिकेवर ठाम भर देताना ओवैसी म्हणाले, बिहारमध्ये पाच जागा जिंकल्या. तिथे महिलांनी एकत्र येऊन MIM ला मतदान केलं. पुरुषांनी मतदान दिलं नाही तरी त्यांच्या घरातील महिलाच MIM ला मत देणार. MIM ला इथवर पोहोचवण्यात महिलांचा वाटा सर्वात मोठा आहे.

महापौर नगरचा MIM च ठरवेल

महापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहता नगरच्या राजकारणात AIMIM निर्णायक भूमिकेत येताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे नसताना, MIM चे निवडून येणारे नगरसेवकच महापौर कोण होणार हे ठरवणार आहेत. MIM शिवाय महापौर होणार नाही,असा थेट दावा करत असदुद्दीन ओवैसी यांनी नगरच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका MIM कडेच राहील, असा ठाम संदेश दिला आहे. त्यामुळे महापौर पदासाठी सुरू असलेल्या राजकीय गणितात MIM हा निर्णायक घटक ठरून संपूर्ण सत्ता-समीकरणाला नवे वळण देणार, हे स्पष्ट झाले आहे.आमचे सहा उमेदवार मैदानात उतरले आहेत; MIM शिवाय महापौर होणार नाही असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

15 तारखेला निर्भय मतदान करा

मला पूर्ण विश्वास आहे हे जालीम हरतील. घरातील महिलांनी आम्हाला लढायला शिकवलं,असं सांगत त्यांनी मतदारांना निर्भय मतदानाचं आवाहन केलं. विरोधक पैशाच्या जोरावर लढत आहेत पैसे न पाहता विकास पाहा. 15 तारखेला न घाबरता मतदान करा असा स्पष्ट संदेश दिला.

मोदी सरकार, वक्फ कायदा व RSS वर थेट टीका

ओवैसींनी आरोप केला की नरेंद्र मोदी सरकारने चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अजित पवार यांच्यासोबत वक्फ कायदा केला असून भाजपा–RSS मशीद, मदरसे बळकवण्याचा प्रयत्न करत आहे. हा कायदा गैरकायदा आहे मोदी सरकार जुल्म करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

संविधानावर ठाम भूमिका

मी ‘हिजाब घातलेली मुलगी पंतप्रधान होऊ शकते’ असं म्हटलं होतं. पाकिस्तानच्या संविधानात एकच समाज लिहिलेला आहे पण डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळे कोणालाही पंतप्रधान होता येतं. याला विरोध करणारा वेडा आहे,असं ठामपणे ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री मुस्लिम वस्त्यांत बांगलादेशी म्हणत फिरत असल्याचा आरोप करत, भाजपा–RSS मोबाईलच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत अशी टीका केली.

नागरिकांना थेट केले आवाहन

या निवडणुकीत मतदान केलं तर मोदींना दाखवून देऊ आम्ही कमी नाही. त्यामुळे MIM च्या उमेदवारांना मतदान करा, विजय द्या,असं आवाहन करत ओवैसींनी भाषणाची सांगता केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या