Sanchar Saathi App : केंद्र सरकारने संसदेत मोठी घोषणा करत देशात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनवर “संचार साथी” सायबरसुरक्षा अँप प्री-इंस्टॉल करणे बंधनकारक करणारा आपला आदेश मागे घेतला आहे.
अँपलसारख्या कंपन्यांसह सर्व मोबाइल फोन उत्पादकांना देण्यात आलेले आदेश मागे घेण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांकडून दोन दिवसांपासून याला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर संचार सक्ती करण्याचे आदेश मागे घेण्यात आले आहेत.
संचार साथी नेमकं काय?
संचार साथी हे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचे (DoT) एक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म मोबाईल आणि यूजर्सची सुरक्षा वाढवणे आणि सरकारी डिजिटल सेवांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा मूळ उद्देश 16 मे 2023 रोजी तत्कालीन दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले होते लाँच.
संचार साथीचे फायदे काय?
संचार साथीमध्ये “ब्लॉक युवर लॉस्ट/स्टोलन मोबाईल” नावाची सुविधा आहे. यामुळे हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधणे शक्य आहे. देशभरातील सर्व नेटवर्कवर फोन ब्लॉक केला जाऊ शकतो. तसेच
जर कोणी फोन चालू करण्याचा प्रयत्न केल्यास लोकेशन ट्रेस करणे शक्य आहे. यात नो मोबाईल कनेक्शन्स इन युअर नेमचे फिचर यामुळे तुमच्या नावावर किती सिम कार्ड याची इत्यंभूत माहिती मिळणे शक्य होते. एखादा नंबर तुम्ही कधीही वापरला नसेल तर, त्याबाबत त्वरित तक्रार करता येते.
फोन अनब्लॉक करणे शक्य
तुमचा मोबाईल फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास, ‘संचार साथी’ ॲपद्वारे ब्लॉक करणे शक्य आहे. जर, तुम्हाला फोन परत मिळाला, तर तुम्ही तो याच ॲपद्वारे अन-ब्लॉक देखील करू शकता. ॲपमध्ये ‘चक्षु’ सर्विस. याचा वापर करून, वापरकर्त्यांना आलेल्या कोणत्याही संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेसची तक्रार करता येते
तुमचा फोन बनावट आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘संचार साथी’ ॲप मदत करते.
यामध्ये फक्त तुमच्या फोनचा 15 अंकी IMEI नंबर टाका
हे फीचर फोनचा ब्रँड, मॉडेल नंबर आणि निर्मितीची माहिती दाखवतो ज्यामुळे तुम्ही बनावट फोन खरेदी करण्यापासून वाचू शकता.
परदेशी कॉल्सची तक्रार
जर तुम्हाला भारतीय मोबाईल नंबरवरून परदेशातून आलेला कॉल आल्यास, त्याची तक्रार या ॲपद्वारे करता येते यासाठी तुम्हाला कॉलचा नंबर, वेळ आणि देशासारखे तपशील देऊन तक्रार नोंदवावी लागते.



