BMC Election: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (उबाठा) उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. रविवारी रात्रीपासून हे वाटप सुरू झाले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीवर बोलावलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म हाताने दिले.
ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यांना मातोश्रीवर रात्री बोलावण्यात आले होते. काही उमेदवारांना रात्री एबी फॉर्म देण्यात आले, तर काहींना आज सकाळी ११ वाजल्यानंतर दिले जाणार आहेत. एबी फॉर्म वाटप करतानाही प्रचंड गुप्तता पाळली जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.
बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्म देऊन अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे पक्षातील संभाव्य उमेदवारांची काही नावे समोर येऊ लागली आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी आज किंवा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेसोबत युती जाहीर केली असून, जागावाटपाचा तपशील लवकरच समोर येईल.
खालील उमेदवाराणा एबी फॉर्म बहाल
प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंतप्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर प्रभाग क्र. ६४ सबा हारून खानप्रभाग क्रमांक ४०- सुहास वाडकर प्रभाग क्रमांक २०६- सचिन पडवळ प्रभाग क्रमांक ९३-रोहिणी कांबळेप्रभाग क्र. १०० साधना वरस्कर प्रभाग क्र. १५६ संजना संतोष कासले प्रभाग क्र. १६४ साईनाथ साधू कटके प्रभाग क्र. १६८ सुधीर खातू वार्ड प्रभाग क्र. १२४ सकीना शेखप्रभाग क्र.१२७ स्वरूपा पाटील प्रभाग क्र- ८९ गितेश राऊत प्रभाग क्र- १४१- विठ्ठल लोकरे प्रभाग क्र – १४२- सुनंदा लोकरे प्रभाग क्रमांक १३७- महादेव आंबेकरप्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे प्रभाग १६७ – सुवर्णा मोरे प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर प्रभाग क्र ९५ – चंद्रशेखर वायंगणकर प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक



