BMC Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली असून या निवडणुकीसाठी संयुक्त जाहीरनामा देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईकरांसाठी जाहीर करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात मुंबईकरांना मोफत वीज देण्यात येणार असं आश्वासन देखील राज आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जाहीरनामा प्रसिद्ध होताच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासनाची व केलेला जाहीरनामा काहीच पूर्ण करणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे, ते मुख्यमंत्री असताना केवळ दोन दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची काम केली, ते उद्धव ठाकरे करू शकत नाही असेही ते म्हणाले.
मुंबईला सर्व जगातलं सुविधायुक्त शहर, भारतातला सर्वात विकसित शहर, मुंबईचा व्हिजन 2047 चा मॅप देवेंद्रजींनी केला आहे . उद्धव ठाकरे यांच्या कार्यकेळाचा अभ्यास जर केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, किती खोटारड्या घोषणा केल्या त्या लोकांना माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केलेला जाहीरनामा किंवा दिलेली आश्वासन, काहीच पूर्ण करणार नाही.
मोफत वीज देण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही, हे खोटारडा आश्वासन दिले गेला आहे. 25 वर्ष महापौर पदावर राहूनही जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही, त्यासाठी देवेंद्रजींना पुढे यावे लागले. त्यामुळे अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही अशी टीका बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर केली.
तर दुसरीकडे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला.
अजितदादांनी जे मानलं खऱ्या अर्थाने त्यांनी भाजपवर टीकाटिपणी केली आहे, भारतीय जनता पार्टी बद्दल वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या. समन्वय समितीमध्ये असं ठरलं होतं की मित्र पक्षाचे मनभेद आणि मतभेद होणार नाहीत, अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला हव्या होत्या,परंतु जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाळलं नाही असं देखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.



