Chandrashekhar Bawankule: राज्यातील महसूल विभागाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. महसूल विभागाने आता डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाकडून अनेक धडाकेबाज निर्णय घेत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्यात डिजिटल 7/12 ला अधिकृत मान्यता मिळणार आहे. तसेच अधिकृत उतारा देखील फक्त 15 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता 7/12 साठी तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज देखील संपली आहे. तसेच डिजिटल स्वाक्षरी, QR, कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले 7/12, 8-अ व फेरफार उतारे डिजिटल उपलब्ध होणार आहे. तसेच हे सर्व उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असल्याची देखील माहिती राज्य सरकारने दिली आहे.
हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहितोय. राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल, याची मला खात्री आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
महसूल विभागात डिजिटल क्रांती
डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे:
• डिजिटल 7/12 ला अधिकृत मान्यता
• फक्त ₹15 मध्ये अधिकृत उतारा उपलब्ध
• तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली
• डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले 7/12, 8-अ व फेरफार उतारे
• सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध
हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय लिहितोय. राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल, याची मला खात्री आहे.



