6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Eknath Shinde: राज्यभरात 11 दिवसांत 51 ठिकाणी प्रचार सभा अन् रोड शो ; एकनाथ शिंदेंचा झंझावाती प्रचार

Eknath Shinde : मुंबईसह राज्यातील २८ महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला. राज्यभरात मागील १० दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ५१ ठिकाणी प्रचार केला. यात २९ प्रचार सभा आणि २५ रोड शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारा दरम्यान शिवसेनेच्या १४ शाखांना भेट दिली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रोड शोला जनतेमधून तुफान प्रतिसाद मिळाला.

राज्यात शिवसेना भाजपसोबत महायुतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढत आहे. अमरावती आणि अकोला येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. तसेच छत्रपती संभाजी नगर, मीरा भाईंदर, नाशिक, कोल्हापूर, उल्हासनगर, कल्याण येथेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. मुंबई आणि ठाणे महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो, प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

नवी मुंबई महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढत असून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या भागांमध्ये रोड शो केले. तसेच वरळी डोम येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि शिवाजी पार्क येथे महायुतीच्या मुंबईतील जाहीर सभेत ते सहभागी झाले होते. ३ जानेवारी ते १३ जानेवारी या ११ दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी २९ जाहीर सभा, २५ रोड शो आणि १४ शाखांना भेट दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या