7 C
New York
Sunday, March 1, 2026

Buy now

spot_img
spot_img

Gauri Garje Case : डॉ. गौरी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आई-वडिलांचे गंभीर आरोप!

Gauri Garje Case : तीन दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी मुंबईतील वरळी भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्यभरात खळबळ उडालीय. या घटनेनंतर मृत डॉ. गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी अनंत गर्जे याच्यासह अजय गर्जे आणि शीतल आंधळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात आतापर्यंत फक्त अनंत गर्जे याला अटक करण्यात आली असून बाकी आरोपींना अटक झालेली नाहीये. अशातच आता फिर्यादी अशोक पालवे यांनी भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांना अटक करण्याची मागणी लावून धरलीय. आरोपपत्रात नाव असूनही अटक का केली गेली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पतीचे अनैतिक संबंध असल्यानं त्यांच्यात वाद सुरु होते, आणि यातूनच माझ्या मुलीचा बळी गेला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय.

अशातच डॉ. गौरी यांच्या आईने मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी एका वाहिनीशी संवाद साधला असता काही गोष्टींचा उलगडा केलाय. माझी मुलगी जेव्हा लग्न होऊन नांदायला गेली तेव्हा अजय गर्जे आणि शीतल आंधळे हे दोघेही त्यांच्यासोबत राहत होते. तसेच या तिघा जणांनी माझ्या मुलीला मारून टाकले.

विशेष म्हणजे माझ्या मुलीचं वजन हे 70 किलो होतं. यांचं म्हणणं आहे की ती फॅनला लटकली होती. तर तिला अनंत गर्जे याने एकट्याने खाली कस उतरवलं? हे एकट्याच काम नाहीये. त्याचप्रमाणे अनंत गौरीला घेऊन 30 माजले उतरला कसा? खिडकीतून आत गेला कसा? बेडरूमच्या बाजूची खिडकी अशा ठिकाणी होती जिथून कोणीही आत जाऊ शकत नाही! शिडी लावायला जागाच नसताना कोणी आतमध्ये कसं जाऊ शकत? अशा अनेक घटनांवर डॉ. गौरीच्या आईने बोट ठेवलंय.

गौरीच्या आत्महत्येपूर्वी अनंतची पहिली पत्नी गर्भवती असल्याची कागदपत्र हाती लागल्याने ती अस्वस्थ होती. तीच कागदपत्र तिने आम्हाला देखील पाठवली होती. यावरून त्यांच्यात कायम वाद होत असत, आणि या वादातूनच अनंत गर्जे त्याचा भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे या तिघांनी मिळून माझ्या मुलीचा जीव घेतलाय. असा जबाब डॉ. गौरीच्या वडिलांनी नोंदवलाय.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या