INDvsAUS 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधील द गॅबा येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 ने बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होईल.
भारतीय संघात बदल होण्याची शक्यता
भारताने गेल्या दोन विजयांमध्ये खूप संतुलित क्रिकेट खेळले आहे, त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव संघात रिंकू सिंग किंवा नितीशकुमार रेड्डीला संघात स्थान देऊ शकतात अशी चर्चा आहे.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने लय मिळवली आहे, तर सूर्या आणि तिलक वर्मा यांनी मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी युनिटने सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
तर कांगारूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतात. शेवटच्या टी20 मध्ये जोश फिलिपची कामगिरी अप्रभावी होती, त्यामुळे मिचेल ओवेनला त्याच्या जागी घेण्याचा विचार केला जाऊ शकतो.
कशी असणार आजची खेळपट्टी ?
गब्बाची खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली गेली आहे. गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये भरपूर वेग आणि उसळी मिळते.
या सामन्यात जसप्रीत बुमराह हा प्रमुख फोकस असेल. तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळींचा टप्पा गाठण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने 2021 पासून सलग तीन टी-20 सामने कधीही गमावलेले नाहीत. 2016 पासून भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग तीन टी-20 सामने जिंकलेले नाहीत. गाब्बा येथे दोन्ही संघांमध्ये फक्त एक टी-20 सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 4 धावांनी पराभूत केले.
दोन्ही संघांसाठी संभाव्य प्लेइंग 11
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झांपा, महली बियर्डमन.



