Jalna Politics: जालना महापालिकेसाठी भाजप शिवसेनेने होणारी युती तुटली असून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप नेते कैलास गोरंटयाल यांच्यातील जागा वाटपाच्या वादामुळे महापालिका निवडणुकीत युती तुटली असं सांगण्यात येत आहे.
भाजपने 65 पैकी 37 जागांची मागणी केली होती.मात्र शिवसेनेला ही बाब मान्य नव्हती.शिवाय कैलास गोरंटयाल यांच्यासोबत काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केलेल्या 23 जागांची मागणी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांनी केली. या जागा देण्यास गोरंटयाल यांनी विरोध केला त्यामुळे जालन्यात अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटयाल यांच्या वादात युती तुटली आहे.
दरम्यान भाजपने 65 पैकी 64 उमेदवार उभे केले असून एका जागेवर रिपाइं आठवले पक्षाचा उमेदवार देण्यात आला आहे असल्याची माहिती भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे जालना महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे.



